जे कुणालाच जमत नाही ते शेगावच्या ७ वर्षांच्या चिमुकलीने करून दाखवलं! जागतिक दर्जाच्या "वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड" मध्ये झाली नोंद! वाचा असं केलं तरी काय ,तेही अवघ्या २ मिनिटांत

 
guh
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेगाव येथील श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल मध्ये पहिल्या वर्गात शिकणाऱ्या धनश्री खोंड या ७ वर्षीय चिमुकलीने जागतिक दर्जाचा रेकॉर्ड स्थापित केलाय. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणाऱ्या या चिमुकलीच्या या रेकॉर्ड ची दखल वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड ने सुद्धा घेतली आहे. डोके खाली करून संपूर्ण शरीराचा तोल हातावर देऊन तिने दोन मिनिटांत तब्बल १२५ कोलांटउड्या मारल्या आहेत.

 या क्रीडा प्रकाराला कार्टव्हील असे म्हणतात. या अतिशय कठीण प्रकारात तिने प्रावीण्य मिळवले आहे.     प्रचंड मेहनत आणि सरावाच्या भरवश्यावर तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे वर्ल्ड ग्रेटेस्ट रोकॉर्ड मध्ये धनश्री ची नोंद झाली आहे.  धनश्रीवर कौतुकाचा वर्षाव होत असून संस्थेचे संचालक मंडळ, पालक , शिक्षक या सर्वांनी धनश्रीचे कौतुक केले आहे.