७८ हजारांची सोयाबीन, तूर गोठ्यातून लांबवली, मेहकर तालुक्यातील घटना

 
thief
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मेहकर तालुक्यातील विश्वी येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात ठेवलेल्या शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. ६ पोटे सोयाबीन आणि १० कट्टे तूर चोरट्यांनी लंपास केली. ही घटना २१ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.
शेतकरी भास्कर चंद्रभान चरडकर (४२) यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात तूर आणि सोयाबीन ठेवली होती. २१ एप्रिलला सकाळी त्यांना गोठ्यातील शेतमाल लंपास झालेला दिसला. एकूण ७८ हजार रुपयांचा शेतमाल चोरट्यांनी लंपास झाल्याची तक्रार त्यांनी मेहकर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.