चिखली तालुक्यातील ६० तलाठी, ९ मंडळ अधिकाऱ्यांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र!

 
चिखली (ऋषि भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विविध प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाभरातील तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी २३ जुलै रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. बदली संदर्भातील प्रस्तावाचा निषेध म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तीव्र स्वरूपाचा निषेध नोंदविला. जिल्हाभरातील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. येत्या गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आंदोलन करणार असल्याचे आंदोलक अधिकाऱ्यांनी सांगितले. इतकेच नाही तर, आंदोलनाची दखल न घेतल्यास २९ जुलैपासून तलाठी, मंडळ अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. चिखली तालुक्यातील ६० तलाठी आणि ९ मंडळ अधिकारी यांनी सहभाग घेवून एकदिवसीय आंदोलन यशस्वी केले .
 
विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वामध्ये हे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आंदोलक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, तलाठी संवर्गातील बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात येवून प्रस्तावित बदल्या रद्द झाल्या पाहिजे, जिल्हास्तरावरील तलाठी आस्थापना रद्द व्हावी, शिवाय उपविभागीयस्तरावर आस्थापना बदली प्रक्रिया करण्यात यावी, आर्थिक व सेवाविषयक इतर मागण्या निवेदनात नमूद आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नसल्याने मंडळ अधिकारी आणि तलाठी अधिकाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. याधीही जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांनी काळा फिटी लावून आंदोलन केले होतेचिखली तालुक्यातील ६० तलाठी आणि ९ मंडळ अधिकारी यांनी सहभाग घेवून एकदिवसीय आंदोलन यशस्वी केले . यावेळी पटवारी संघटनेचे उपविभागीय अध्यक्ष विकास डुकरे, सहसचिव संजय डुकरे, तालुका अध्यक्ष परसराम सोळंके, सचिव निलेश सोनुने उपाध्यक्ष जय शिरसाट, शेजोळ मॅडम, अर्चना मॅडम, रजनी देशमुख, आदींची उपस्थिती होती .