१७ वर्षीय मुलगी अजिसपूरमधून गायब!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

 
7565
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देवीच्या रात्रेसाठी पुण्यावरून मूळगावी अजिसपूरला आलेल्या कुटुंबातील १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना २१ एप्रिलला समोर आली आहे. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.

मूळ अजिसपूरच्या व सध्या करडा (ता. शिरूर जि. पुणे) येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. १४ एप्रिलला देवीच्या यात्रेसाठी या महिलेचे कुटुंब अजिसपूरला आले होते. यात्रा संपल्यानंतर २१ एप्रिलला विवाहित मुलीला भेटण्यासाठी ही महिला भोकरदनला जात होती.

त्‍याचवेळी सायंकाळी पाचला तिला फोन आला की, १७ वर्षीय मुलगी बराच वेळपासून घरात नाही. त्‍यामुळे महिला तातडीने अजिसपूरला परतली. गावात मुलीचा सगळीकडे शोध घेतला. तिच्या मैत्रिणी, नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार देण्यात आली.