मोदींच्या प्रचारासाठी जिल्हायातुन १५० बस यवतमाळला! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले, हा जनतेच्या तिजोरीवर दरोडा;
ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळच्या जिवन्नोत्ती अभियांना अंतर्गत आयोजित महिला मेळाव्याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आहेत. या सभेला जिल्हयातील चिखली येथुन २२ , बुलडाणा २६, खामगांव २१, मेहकर २५, मलकापुर २०, जळगांव जामोद १८, शेगांव १८ अशा एकुन सुमारे १५० बसेसच्या नियमीत बसफेऱ्या रद्द करून यमतमाळ ला सरकारी खर्चावर पाठविण्यात आल्या आहेत. ऐनवेळी प्रत्येक आगारातुन बस फेऱ्या रद्द करून बसेस सरकारी खर्चाने यवतमाळला पाठविण्यात आल्याने जिल्हाभरातील प्रवाशांसह विशेष करून शेतकरी व परीक्षेला जाणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांना नाहक हाल सोचावे लागले आहेत. ऐकीकडे विद्यार्थ्यांची १२ वी ची परीक्षा अनं दुसरीकडे नुकत्याच जिल्हयात झालेल्या गारपिटीची ऑनलाईन नोंद करण्यारकीता तालुका ठिकाणी जाण्यासाठी शेतक-यांची उडालेली धांदल, असे चित्र जिल्हयातील उपरोक्त आगारांमध्ये तसेच जिल्हाभरात पाहवयास मिळाले. महत्वाचे म्हणजे जनतेच्या कर स्वरूपातुन गोळा झालेला शासनाच्या तिजोरीतील पैसा म्हजेच जनतेचा पैसा पैशाचा मोदी सरकारकडुन लोकसभेच्या प्रचारासाठी गैर वापर करण्यात येत असल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी केला आहे.