Amazon Ad

चिखलीतल्या १५ पानटपरीवाल्यांना दंडाचा दणका! वाचा, नेमके काय आहे प्रकरण..

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील १५ पानटपरीवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने कारवाई केली. यात पानटपरीधारकांकडून तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या निर्देशानुसार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुशिल चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली शहरातील मुख्य परिसरातील शिवाजी ज्युनिअर कॉलेज, बस स्टँड परिसर, खामगाव चौफुली, आंबेडकर चौक आदी परिसरात १५ पानटपरीवर कारवाई करीत तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने, जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण विनिमय अधिनियम २००३ नुसार ही कार्यवाही करण्यात आली.

 ही कारवाई जिल्हा अंबलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा अधिकारी श्री. सोळंके, चिखली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक श्री. व्यवहारे, पोलिस शिपाई श्री. मिसाळ, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले, समुपदेशक श्री. सरकटे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.