१२ लाख लोकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

जिल्हा आरोग्‍य यंत्रणेचे यश
 
corona
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यानुसार 11 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण उद्दिष्ट असलेल्या 21,87,294 पैकी 12,14,865 लाभार्थ्यांचे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. त्याची टक्केवारी 55.54 टक्के आहे.
जिल्ह्यात 52 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 50 टक्‍क्‍यांजवळ आलेली 15 केंद्रं आहेत. 50 ते 75 टक्के डोस घेतलेले लाभार्थी संख्या असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र 35 आहेत. तसेच 75 ते 100 टक्के पहिला डोस घेतलेले लाभार्थी केंद्र 2 आहेत. जिल्हा प्रशासन लसीकरण पूर्ण होण्याकरीता सातत्याने प्रयत्न करत आहे.