आजपासून दहावीची परीक्षा! जिल्ह्यात १५३ केंद्रांवर ३९६८४ विद्यार्थी

 
fyjjg
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात आज, २ मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होत आहेत. बुलडाणा  जिल्ह्यातल्या १५३ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार असून शिक्षण विभागाने आवश्यक ती पूर्ण तयारी केली आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यावर शिक्षण विभागाचे विशेष लक्ष आहे.

 बुलडाणा जिल्ह्यातील  १३ तालुक्यांतील १५३ परीक्षाकेंद्रावर ३९ हजार ६८४ विद्यार्थी १० वी ची परीक्षा देणार आहेत. १२ वी परीक्षेप्रमाणेच या परीक्षेसाठी सुद्धा शिक्षण विभागाने भरारी पथके नियुक्त केले आहेत. २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या १२ वीच्या परीक्षेत आतापर्यंत ५ कॉपी बहादरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे १० वीच्या परीक्षेसाठी सुद्धा भरारी पथकांवर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी, कुठलीही पूर्वसूचना न देता भरारी पथके परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.