डॉ आस्मा मुजावर ठरल्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार !

 
nnnm
सिंदखेडराजा( बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
 महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सिंदखेडराजा येथील नायब तहसीलदार डॉ. आस्मा मुजावर ह्या जिल्ह्यातील उत्कृष्ट नायब तहसीलदार ठरल्या आहेत.  

महसूल दिनाच्या औचित्य साधून बुलढाणा येथे दि ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी एस .राममूर्ती यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते  यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

महसूल विभागात डॉ. अस्मा मुजावर यांची धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी पुरवठा, निवडणूक , निवासी नायब तहसिलदार आणि महसूल   विभागात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार अधिकारी म्हणून त्यांचा गौरव केला . यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, उपजिल्हाधिकारी दिनेश गीते,  उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार सुनील सावंत आदी सह अनेक अधिकारी उपस्थित होते.