लाखो रुपयांची नोकरी सोडून दाम्पत्य भारतात करतेय शेती

नवी दिल्ली ः पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीतील घर आणि लाखो रुपये पगारात ऐशोआरामात आयुष्य जगणार्या दाम्पत्याने अमेरिका सोडून भारतात परतत आता गुजरातमध्ये सेंद्रिय शेती सुरू केली आहे. विवेक शाह आणि वृंदा शाह हे दाम्पत्य मुळचे गुजरातचे रहिवासी असून ते अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत एका कंपनीत कार्यरत होते. गलेगठ्ठ पगार आणि स्वतःचे अलिशान घर, अशा सर्व …
 

नवी दिल्ली ः पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीतील घर आणि लाखो रुपये पगारात ऐशोआरामात आयुष्य जगणार्‍या दाम्पत्याने अमेरिका सोडून भारतात परतत आता गुजरातमध्ये सेंद्रिय शेती सुरू केली आहे. विवेक शाह आणि वृंदा शाह हे दाम्पत्य मुळचे गुजरातचे रहिवासी असून ते अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत एका कंपनीत कार्यरत होते. गलेगठ्ठ पगार आणि स्वतःचे अलिशान घर, अशा सर्व काही सुखसोयी असतानाही या दोघांच्याही डोक्यात सेंद्रिय शेती करण्याचा विचार आला. मग त्यांनी पुढचा मागचा कसला ही विचार न करता नोकरीसोबतच सिलिकॉन व्हॅलीलाही रामराम ठोकला. गुजरातमधील नादियाद शहराजवळच भारतात परतलेल्या विवेक व वृंदा यांनी दहा एकर शेती खरेदी केली. सेंद्रिय शेती करण्यापूर्वी दोघांनीही शेती संबधित अभ्यासक्रम पूर्ण केला. दोघेही आता शेतात कष्ट घेत असून, आपल्या शेतात बाजरी, गहू, आलू, केळी, पपई, कोथिंबीर व वांगी आदी पिके आणि फळभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. दोघेही त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होत असतात. पाण्याच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी शाह दाम्पत्याने शेततळी तयार केली. 20 हजार लिटर पाणी जलपुर्नभरण पद्धतीने या शेततळ्यात जमा झाले आहे. पिकांसाठी हे पाणी भरपूर काळ वापरत असून, ते पाणी शुद्ध राहण्यासाठी शुद्ध करणारे झाडे लावली असल्याचे विवेक शाह सांगतात. वृंदा शाह सेंद्रिय शेतीबद्दल म्हणाल्या, की किटक नियंत्रण शेती करताना करणे आवश्यक होते. शेती करताना पहिले आव्हानच असते. त्यावर मात करण्यासाठी आम्ही बहुपीक आणि आंतरपीक पद्धतीचा वापर करतो. तसेच तुळशी व लिंबाची झाडेही लावली आहेत.