अरेच्च्या तरुणाच्या पोटात निघाले गर्भाशय

मुंबईत डॉक्टरांनी शस़्त्रक्रिया करून काढलेमुंबई : पुरुष कधी गर्भार राहतो का? असा सवाल केला जातो. ते बर्याचदा खरेही असले तरी भविष्यात तंत्रज्ञानामुळे कदाचित तेही शक्य होईल. पण तूर्तास एका तरुणाच्या पोटात आढळलेले गर्भाशय डॉक्टरांनी शस़्त्रक्रिया करून काढून टाकले आहे. मुंबईत भायखळा येथे एका १९ वर्षीय तरुणाला डाव्या बाजूला पोटदुखीचा सातत्याने त्रास होत होता. अनेक उपाययोजना …
 

मुंबईत डॉक्टरांनी शस़्त्रक्रिया करून काढले
मुंबई :
पुरुष कधी गर्भार राहतो का? असा सवाल केला जातो. ते बर्‍याचदा खरेही असले तरी भविष्यात तंत्रज्ञानामुळे कदाचित तेही शक्य होईल. पण तूर्तास एका तरुणाच्या पोटात आढळलेले गर्भाशय डॉक्टरांनी शस़्त्रक्रिया करून काढून टाकले आहे. मुंबईत भायखळा येथे एका १९ वर्षीय तरुणाला डाव्या बाजूला पोटदुखीचा सातत्याने त्रास होत होता. अनेक उपाययोजना केल्या, भरपूर औषधे घेतली तरी त्रास थांबत नव्हता. अखेर तब्बल दोन अडीच वर्षे हा त्रास सहन केल्यानंतर असह्य होऊन त्याने जे.जे. हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासले असता तेथे एक गाठ आढळली. पण अधिक तपासण्या केल्या असता त्यांना धक्काच बसला.कारण वैद्यकीय क्षेत्रात अशक्य वाटणारी गोष्ट त्यांना दिसली. त्या युवकाच्या पोटात चक्क गर्भाशय असलेले वैद्यकीय चाचणीत आढळले. या रुग्णाच्या पोटात अंडकोषातील अंडाशय उपलब्ध नव्हते. पोटात डाव्या बाजूला बीजांड व त्याभोवती रक्त साकाळून गाठ झाल्याचे दिसले. शिवाय त्या रुग्णाच्या पोटात महिलांमध्ये असणारे गर्भाशय,योनी व इतर जनेंद्रियांचे अविकसित भाग सापडले. जनुकीय तपासणीतून त्या युवकाच्या शरीरात स्त्रीत्वासोबतच पुरुषाचे जनुकीय अंशही उपलब्ध असल्याचे आढळून आले. हा तरुण द्विलिंगी असून त्याच्यावर शस़्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकण्यात आले आहे. परंतु या तरुणाला आता यापुढील आयुष्यात पुरुष म्हणून जगायचे की स्त्री म्हणून याचा निर्णय घ्यावा लागणार असून त्यानंतर काही शस्त्रक्रिया करून त्याला एक आयुष्य सुरळीतपणे जगता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात ही गोष्ट अशक्य नाही. हजारात एक अशी कसे आढळू शकते,असे त्याचवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.