हिवरा गडलिंग असे ठेवले जातेय कोरोनापासून दूर..!; अवघ्या गावात जंतूनाशक फवारणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हिवरा गडलिंग येथील ग्रामपंचायतीतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सरपंच पूनम अनंता खरात यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, ग्रामस्थांत जनजागृती करण्याशिवाय विविध उपाययोजना प्राधान्याने केल्या आहेत. आज, 19 मे रोजी संपूर्ण गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली. आजवर दोन वेळेस गावात जंतूनाशक फवारणी केली आहे. ट्रॅक्टरद्वारे ही फवारणी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हिवरा गडलिंग येथील ग्रामपंचायतीतर्फे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न केले जात आहेत. सरपंच पूनम अनंता खरात यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, ग्रामस्‍थांत जनजागृती करण्याशिवाय विविध उपाययोजना प्राधान्याने केल्या आहेत. आज, 19 मे रोजी संपूर्ण गावात जंतूनाशक फवारणी करण्यात आली.

आजवर दोन वेळेस गावात जंतूनाशक फवारणी केली आहे. ट्रॅक्टरद्वारे ही फवारणी करतेवेळी सरपंच पूनम अनंता खरात, उपसरपंच परमेश्वर जामसिंग चव्हाण, सदस्य पती रविभाऊ खरात, दासाभाऊ मानतकर, सदस्य तुळशीदास मानकर, ज्ञानेश्वर खरात, वैभव खरात, ऋषी खरात, शुभम सरकटे यांची उपस्‍थिती होती. गाव आणि तांड्यात ही फवारणी झाली.