हातणी-रायपूर-दुधा-धाड रस्त्याचे काम घेणार वेग; आमदार श्‍वेताताई महाले भेटल्या गडकरींना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातणी- रायपूर -सैलानी- दुधा- धाड- भोकरदन हा नॅशनल हायवेबद्दल अनेक तक्रारी असून, वारंवार सांगूनही अधिकारी कामावर लक्ष देत नाहीत. रस्ता खोदून ठेवून काम अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तात्काळ कामाला गती देण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. मात्र अधिकारी व कंत्राटदार अतिशय संथपणे काम करत असल्याने येत्या सैलानी यात्रेपर्यंत रस्ता वाहतुकी योग्य बनविण्यात …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हातणी- रायपूर -सैलानी- दुधा- धाड- भोकरदन हा नॅशनल हायवेबद्दल अनेक तक्रारी असून, वारंवार सांगूनही अधिकारी कामावर लक्ष देत नाहीत. रस्ता खोदून ठेवून काम अनेक महिन्यांपासून बंद असल्याने तात्काळ कामाला गती देण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. मात्र अधिकारी व कंत्राटदार अतिशय संथपणे काम करत असल्याने येत्या सैलानी यात्रेपर्यंत रस्ता वाहतुकी योग्य बनविण्यात यावा, अशी मागणी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. त्यावर तातडीने श्री. गडकरी यांनी रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश फोनवरून अधिकार्‍यांना दिले. आमदार महाले पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचनाही श्री. गडकरींनी अधिकार्‍यांना केल्या.
आज, 11 फेब्रुवारीला दिल्लीत गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी भेट घेतली. सैलानी यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण व्हावा अशी मागणी आमदार महाले पाटील यांनी केली. या रस्त्याचे काम अतिशय संथपणे सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक तुरळक सुरू आहे. परंतु पावसाळ्यात वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे रस्त्यावरील गावांच्या नागरिकांना शारीरिक, मानसिक तथा आर्थिक त्रास सहन करावा लागला. अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. बुलडाणा जिल्हा रस्ते सुरक्षा मिटींग घेतली. त्यावेळी रस्त्याशी संबंधित अधिकार्‍यांना बोलाविलेले असतानाही ते मिटींगला उपस्थित राहिले नाहीत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांना कळविले असता त्यांना पुन्हा मिटींग बोलावली परंतु त्या मिटींगमध्ये शाखा अभियंता व्यतिरिक्त कुणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. रस्त्याचे काम रखडून पडल्याने कामाची किंमत वाढत चाललेली आहे. रस्त्यावर हिंदु-मुस्लीमांचे श्रध्दास्थान सैलानी दर्गा असून फेब्रुवारी-मार्च मध्ये तेथे मोठी यात्रा भरत असते. यात्रेत देशभरातून जवळपास 25 लाख भाविक येत असतात. रस्ता खराब असल्याने लाखो भाविकांना प्रचंड त्रास होणार आहे. यात्रेअगोदर रस्ता वाहतुकी योग्य बनविण्यासाठी युध्दस्तरावर काम करण्याचे संबंधितांना निर्देश देण्यात यावे. तसेच कंत्राटदाराने खोदून ठेऊन काम अनेक महिने बंद ठेवल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे पत्रही आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी गडकरींना दिले.