संग्रामपूर तहसीलवर धडकला बैलगाडी मोर्चा

बुलडाणा (संजय मोहिते) ः राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्यांच्या दीर्घ आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील संग्रामपूर येथील तहसील कार्यालयासमोर आज गणराज्य दिनी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा आगळावेगळा मोर्चा प्रशासन व सर्वसामान्यांचे लक्ष वेधणारा ठरला.केंद्राने पारित केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवून ते रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणामधील हजारो शेतकरी व समर्थक राजधानी दिल्लीच्या सीमेवर …
 

बुलडाणा (संजय मोहिते) ः राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या दीर्घ आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील संग्रामपूर येथील तहसील कार्यालयासमोर आज गणराज्य दिनी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा आगळावेगळा मोर्चा प्रशासन व सर्वसामान्यांचे लक्ष वेधणारा ठरला.
केंद्राने पारित केलेल्या कृषी सुधारणा विधेयकाला विरोध दर्शवून ते रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणामधील हजारो शेतकरी व समर्थक राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून संग्रामपूर येथील तहसीलवर आज सकाळी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. बसस्थानक परिसरातून प्रारंभ झालेल्या मोर्चात अभयसिंह मारोडे, प्रताप मारोडे, वाल्मिक मारोडे, संजय वानखडे, विश्‍वास बकाल, आतिष बकाल, श्री. राजनकर, श्री. डोसे, गणेश वानखेडे यांच्यासह विविध गावांतील शेतकरी आपल्या सर्जा राज्यासह सहभागी झाले.