शेगावमध्ये घर फोडून दागिन्यांवर डल्ला!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकाेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी रोखरकमेसह एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शेगाव शहरातील श्रीरामनगरात समोर आली आहे. घटना १६ डिसेंबर २०२० ते १ ऑगस्ट २०२१ च्या दरम्यान कधीतरी घडल्याचे घरमालकाने तक्रारीत म्हटले असून, आज, ३ ऑगस्टला या घटनेची तक्रार शेगाव शहर पोलिसांत करण्यात आली. त्यावरून …
 
शेगावमध्ये घर फोडून दागिन्यांवर डल्ला!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकाेते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घर फोडून चोरट्यांनी रोखरकमेसह एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शेगाव शहरातील श्रीरामनगरात समोर आली आहे. घटना १६ डिसेंबर २०२० ते १ ऑगस्‍ट २०२१ च्‍या दरम्‍यान कधीतरी घडल्‍याचे घरमालकाने तक्रारीत म्‍हटले असून, आज, ३ ऑगस्‍टला या घटनेची तक्रार शेगाव शहर पोलिसांत करण्यात आली. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

ओमप्रकाश बद्रीलालजी दवे (६५, रा. प्लॉट नंबर २९, श्रीरामनगर शेगाव) यांनी चोरीची तक्रार दिली आहे. त्‍यांच्‍या घरातून चोरट्यांनी पर्समधील १५ हजार रुपये रोख, दोन सोन्याच्‍या अंगठ्या (किंमत अंदाजे २५ हजार रुपये), मिनी मंगळसूत्रामधील २१ मनी (अंदाजे किंमत ३ हजार रुपये), ६ चांदीचे शिक्के (वजन अंदाजे २०० ग्रॅम, किंमत अंदाजे ८ हजार रुपये) असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. घराच्‍या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटे घरात घुसले होते. कपाट तोडून त्‍यांनी दागिने व रोख लंपास केली. तपास पोहेकाँ गजानन रोहनकार करत आहेत.