विहिरीचे बांधकाम अंगावर पडून युवकाचा मृत्‍यू; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नवीन विहिरीचे बांधकाम सुरू असताना बांधकाम घसरून युवकाच्या अंगावर पडले. यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज, 9 मार्चला सुजातपूर (ता. खामगाव) येथे घडली. निंबाजी गणेश वारे (30, रा. सुजातपूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तो विहिरीवर काम करत होता. अचानक नवे बांधकाम घसरले. त्याखाली तो दबला गेला. यातच गुदमरून …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नवीन विहिरीचे बांधकाम सुरू असताना बांधकाम घसरून युवकाच्‍या अंगावर पडले. यातच त्‍याचा मृत्‍यू झाला. ही घटना आज, 9 मार्चला सुजातपूर (ता. खामगाव) येथे घडली.

निंबाजी गणेश वारे (30, रा. सुजातपूर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे. तो विहिरीवर काम करत होता. अचानक नवे बांधकाम घसरले. त्‍याखाली तो दबला गेला. यातच गुदमरून त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचा संशय आहे. त्‍याला तातडीने खामगाव येथील शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्‍याआधीच मृत्‍यू झाला होता, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.