मोटारसायकल घसरून दोन युवक गंभीर; मोताळा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल घसरून दोन युवक गंभीर झाले. ही घटना आज, 27 एप्रिलला सायंकाळी 5 च्या सुमारास मोताळा- मलकापूर रस्त्यावर शेलापूरनजीक (ता. मोताळा) घडली. गोकूळ रत्नपारखी (23), योगेश संबर (30, दोघे रा. बेलाड ता. मलकापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दोघेही मोताळ्यावरून मलकापूरकडे जात होते. शेलापूरजवळ त्यांची दुचाकी घसरली. गाडीचा वेग अधिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मोटारसायकल घसरून दोन युवक गंभीर झाले. ही घटना आज, 27 एप्रिलला सायंकाळी 5 च्या सुमारास मोताळा- मलकापूर रस्त्यावर शेलापूरनजीक (ता. मोताळा) घडली.

गोकूळ रत्‍नपारखी (23), योगेश संबर (30, दोघे रा. बेलाड ता. मलकापूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दोघेही मोताळ्यावरून मलकापूरकडे जात होते. शेलापूरजवळ त्यांची दुचाकी घसरली. गाडीचा वेग अधिक असल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्‍यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.