मटनाचा बेत भंगला… पोलीस येताच ग्राहकांची धूम, विक्रेता ताब्यात!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवाच सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असतात. मात्र या नियमांचा भंग करून मटन विकणाऱ्या 2 जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेख आलीम शेख कादर (35), नाजीम हनिफ देशमुख (25, रा. पेठ ता. चिखली) अशी मटन विक्रेत्यांची …
Apr 26, 2021, 20:27 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवाच सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असतात. मात्र या नियमांचा भंग करून मटन विकणाऱ्या 2 जणांविरुद्ध अमडापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेख आलीम शेख कादर (35), नाजीम हनिफ देशमुख (25, रा. पेठ ता. चिखली) अशी मटन विक्रेत्यांची नावे आहेत. आन्वी (ता. चिखली) फाट्यावर ही कारवाई काल, 25 एप्रिलच्या रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. उघड्यावर मटन विक्री सुरू असल्याचे आणि तिथे गर्दी झाल्याचे पोलिसांना कळताच उपनिरीक्षक प्रविण सोनवणे यांच्यासह पोकाँ गजानन राजपूत, प्रमोद हुसे यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांना पाहताच मटन खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांनी पळ काढला. विक्रेत्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले.