भरधाव ट्रकने दुचाकीला मागून उडवले, पती-पत्‍नी जखमी; नांदुऱ्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली. यात पती-पत्नी जखमी झाले. ही घटना नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील गणी पेट्रोल पंपाजवळ 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 सुमारास घडली. याबाबत दुसऱ्या दिवशी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील विठ्ठल वाघमारे (58) यांनी …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिली. यात पती-पत्‍नी जखमी झाले. ही घटना नांदुरा शहरातील जळगाव जामोद रोडवरील गणी पेट्रोल पंपाजवळ 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 सुमारास घडली. याबाबत दुसऱ्या दिवशी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

सुनील विठ्ठल वाघमारे (58) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, ते खामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयाजवळ राहत असून, मोठे भाऊ अनिल विठ्ठल वाघमारे व त्यांची पत्‍नी पद्मावती विठ्ठल वाघमारे हे कपडे खरेदी करण्यासाठी खामगाव येथून एमएच 28 एम 1940 क्रमांकाच्या मोटारसायकलने नांदुरा येथे आले होते.  खामगावला परत जाताना शहरातील गणी पेट्रोलपंपाजवळ ट्रकने (क्र. जीजे 18 एझेड 7669) मागून जोरदार धडक दिली. यात पती-पत्‍नी जखमी झाले. त्यांच्या पत्‍नी पद्मावती वाघमारे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अकोला येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तपास पोलीस करीत आहेत.