बापरे बाप ! आज 1264 पॉझिटिव्ह!! बुलडाणा, मोताळा, मेहकरात कोरोनाचा स्फोट: 7 जणांचे बळी

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सलग 3 दिवस जिल्ह्यात चार आकड्यांत कोरोना पॉझिटिव्ह आले असून, आज, 25 एप्रिलला तब्बल 1264 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय! बुलडाणा, मोताळा व मेहकर तालुक्यात कोविडचा जणू काही स्फोट झाल्याचे गंभीर चित्र आहे. हा प्रकोप कायम असतानाच 7 जणांच्या बळीने आरोग्य यंत्रणांची झोप उडविली आहे. रोज शतकी खेळी …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सलग 3 दिवस जिल्ह्यात चार आकड्यांत कोरोना पॉझिटिव्ह आले असून, आज, 25 एप्रिलला तब्बल 1264 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आलाय!  बुलडाणा, मोताळा व मेहकर तालुक्यात  कोविडचा जणू काही स्फोट झाल्याचे गंभीर चित्र आहे. हा प्रकोप कायम असतानाच 7 जणांच्या बळीने आरोग्य यंत्रणांची झोप उडविली आहे.

रोज शतकी खेळी करणाऱ्या बुलडाणा तालुक्याने 24 तासांत 343 पॉझिटिव्हचा आकडा गाठलाय! मोताळ्यात 135 रुग्ण आढळल्याने या 2 तालुक्यांची गोळाबेरीजच 500 च्या वर गेली. मेहकरमधील कोरोनाचा उद्रेक किती भीषण आहे हे 183 या आकड्यांवरून स्पष्ट होते. शेजारील लोणार तालुक्यात 94 रुग्ण आढळले आहेत. खामगाव 68, शेगाव 45, नांदुरा 105, चिखली 95, मलकापूर 67, सिंदखेडराजा 53 या तालुक्यांतील परिस्थिती भीषण आहे. तेथील आकडेच बोलके आहेत. या तुलनेत जळगाव जामोद 37, संग्रामपूर 13  या आदिवासी बहुल तालुक्यांतील तीव्रता कमी आहे. गत 24 तासांत मोठ्या संख्येने नमुने संकलन करण्यात आले. यामुळे तब्बल 8130 अहवाल प्राप्त झाले. पैकी 6817 जण सुदैवी (निगेटिव्ह) ठरले. मात्र 1264 जण जीवन मरणाच्या संघर्षात शामिल झाले.

8 बळी

दुसरीकडे पॉझिटिव्हच्या तुलनेत बळींची संख्याही 8 इतकी आली आहे. गत्‌ 24 तासांत बुलडाणा येथील महिला रुग्णालयातील 7 तर शेगाव येथील संत गजानन कोविड समर्पित हेल्थ सेंटरमधील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.