दुसरी मुलगी पळवून आणली अन्‌ पत्‍नीला म्‍हणाला, तुला तलाक तलाक तलाक..!

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः दुसरी मुलगी पळवून आणून लग्न करत, बायकोला तलाक तलाक तलाक म्हणून तलाक दिल्याचा प्रकार नांदुऱ्यात समोर आला आहे. या प्रकरणी युवकासह त्याच्या वडिलाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निसार खाँ जब्बार खाँ, जब्बार खाँ हबीब खाँ (रा. मदार टेकडी, मलकापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहिता वडनेर भोलजी (ता. नांदुरा) …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः दुसरी मुलगी पळवून आणून लग्‍न करत, बायकोला तलाक तलाक तलाक म्‍हणून तलाक दिल्याचा प्रकार नांदुऱ्यात समोर आला आहे. या प्रकरणी युवकासह त्‍याच्‍या वडिलाविरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. निसार खाँ जब्बार खाँ, जब्बार खाँ हबीब खाँ (रा. मदार टेकडी, मलकापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

पीडित विवाहिता वडनेर भोलजी (ता. नांदुरा) येथील आहे. लग्‍नात हुंडा व दागदागिने कमी मिळाले असे म्हणत निसार खाँने तिचा पाच वर्षांपासून छळ चालवला होता. तिला मारहाणही करायचा. उपाशी ठेवायचा. तू मला पसंत नाही. माझे लग्‍न मर्जीप्रमाणे झाले नाही. त्यामुळे फारकतीसाठी तगादा लावायचा. एक दिवस त्‍याने हद्द केली. आधी लग्‍न झालेले असताना दुसऱ्या एका मुलीला पळवून आणत तिच्याशी लग्‍न केले. त्‍यामुळे माहेरी निघून आलेल्या पत्‍नीला त्‍याने तिथे येऊन तीन वेळा तोंडी तलाक दिला. विवाहितेच्‍या या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी तिच्‍या पती व सासऱ्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला.