जवळा बाजारमध्ये कोरोना उद्रेक; 17 रुग्‍ण आढळले!; जिल्ह्यात बाधितांचा आकडा 19 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे कोरोना उद्रेक झाल्यागत चित्र आहे. या खेड्यात आज, 2 मार्चला तब्बल 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात 427 रुग्ण आढळले असून, 354 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3166 अहवाल प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्‍यातील जवळा बाजार येथे कोरोना उद्रेक झाल्यागत चित्र आहे. या खेड्यात आज, 2 मार्चला तब्‍बल 17 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले. दरम्‍यान, दिवसभरात जिल्ह्यात 427 रुग्‍ण आढळले असून, 354 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3166 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2739 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 427 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 316 व रॅपीड टेस्टमधील 111 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1912 तर रॅपिड टेस्टमधील 827 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 47, बुलडाणा तालुका : हतेडी 1, दुधा 3, सुंदरखेड 3, केसापूर 1, गिरडा 6, पिंपळगाव सराई 1, वरवंड 4, रायपूर 1, सागवन 3, शिरपूर 1, चिखली तालुका : भालगाव 2, शेलगाव 1, हिवरा गडलिंग 1, सवणा 1, उत्रादा 1, केळवद 1, सावरगाव डुकरे 8, वळती 1, सोमठाणा 2, खैरव 1,कोलारा 2,अमडापूर 1, शेलसूर 1, किन्होळा 2, चिखली शहर : 34, सिंदखेड राजा शहर : 9, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 4, पांगरी उगले 1, रताळी 3, मोताळा तालुका : राजूर 1, बोराखेडी 5, गोतमारा 1, पान्हेरा 4, वरूड 2, धा. बढे 2, खरबडी 1, कोथळी 1, खामगाव शहर : 53, खामगाव तालुका : आडगाव 4, घाटपुरी 4, सुटाळा बु 1, गवंढळा 3, अंत्रज 9, माळेगाव 1, कुंबेफळ 1, खामगाव शहर : 2, देऊळगाव राजा शहर : 28, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 2, भिवगाव 1, सिनगाव जहागीर 2, उंबरखेड 2, वाघजई 1,किन्ही पवार 1, अंढेरा 1, बायगाव 1, सावंगी टेाकळे 2, मेहकर शहर : 8, मेहकर तालुका : जानेफळ 1,मलकापूर शहर : 24, नांदुरा शहर : 21, नांदुरा तालुका : वडनेर 3, टाकरखेड 1, जवळा बाजार 17, नारखेड 1, येरळी 1, लोणार तालुका : आरडव 1, खंडाळा 3, लोणार शहर : 1, जळगाव जामोद तालुका : मानेगाव 7, खांडवी 4, धानोरा 1, पिंपळगाव काळे 2, झाडेगाव 5, आसलगांव 2, चावरा 1, जळगाव जामोद शहर : 4, शेगाव शहर : 18, शेगाव तालुका : भोनगाव 2, खेर्डा 1, संग्रामपूर तालुका : सोनाळा 7, वरवट बकाल 1, बावनबीर 1, टुनकी 1, संग्रामपूर शहर : 2, मूळ पत्ता पळसखेड ता. जामनेर 1, जाळीचा देव ता. भोकरदन 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 427 रुग्ण आढळले आहेत.

354 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 354 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 38, बुलडाणा : अपंग विद्यालय 22, सहयोग हॉस्पीटल 4, देऊळगाव राजा : 39, लोणार : 38, चिखली : 44, नांदुरा : 20, सिंदखेड राजा : 8, मोताळा : 12, मलकापूर : 35, जळगांव जामोद : 20, शेगाव : 45, मेहकर : 20

2601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 140008 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16418 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 8669 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19213 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 2601 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 194 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.