आमीर खान नंतर आणखी एका अभिनेत्याचा काडीमोड
मुंबईः हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आमीर खान आणि त्याच्या पत्नीनं घटस्फोट घेतल्याची घटना ताजी असतानाच बाॅलिवूडमधील आणखी एका अभिनेत्यानं पत्नीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
बेखुदी या चित्रपटात काजोलसोबत अभिनेता कमल सदानाने काम केले होते. त्याने आता पत्नी लिसा जॉनला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दशकापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. सध्या हे दोघं परस्परांसोबत राहत नाहीत. “दोन व्यक्तींमध्ये दुरावा होतो. त्यांचं जमत नाही. तेव्हा ते वेगवेगळ्या दिशेने जाऊ लागतात. अशा घटना दुर्मिळ नाहीत. आम्हीसुद्धा त्यातीलच एक आहोत’, त्यानं एका मुलाखतीत सांगितलं. विसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी कमल आणि लिसा यांचा विवाह झाला. या दोघांना मुलगा अंगद आणि मुलगी लिया आहे. लिसा ही मेकअप आर्टिस्ट असून ती सध्या तिच्या आई, वडिलांसोबत गोव्यात राहते. कमलने ‘बेखुदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर “रंग’ या हिट चित्रपटातही त्यानं काम केलं. २०१४ मध्ये कमलनं “रोअर’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं; मात्र या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला.