Buldana Live Exclusive… अबब… जिल्ह्यातील ४४ हजार मतदार झाले यादीतून गायब! साडेआठ हजार “बचावले’!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः साडेवीस लाखांच्या घरात पोहोचलेली जिल्ह्याची मतदारयादी आता काहीशी हलकी झाली आहे! कारण त्यातील तब्बल 44 हजार 646 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 17 हजारांवर नावे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून वगळण्यात आली आहे. मात्र अखेरच्या टप्प्यात का होईना जागे झाल्याने साडेआठ हजारांवर मतदार बचावले आहेत.
1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारांची अंतिम यादी गत् 15 जानेवरी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील तब्बल 53 हजार 225 मतदारांची छायाचित्रे नसल्याचे व ते यादीत असलेल्या निवासस्थानावर राहत नसल्याचे आढळले. यामुळे त्यांना वारंवार सूचित करून छायाचित्र बीएएलओ वा तहसीलमध्ये जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र केवळ 8514 जनांनीच प्रतिसाद दिल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम राहिली.
मात्र इतरांनी काहीच कारवाई न केल्याने अखेर तब्बल 44 हजारांवर मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, उप जिल्हाधिकारी भूषण अहिरे, भिकाजी घुगे यांच्या मार्गदर्शनात 6 एसडीओ व 13 तहसीलदारांनी ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. बुलडाणा तहसीलमधील 17 हजारांवर मतदारांची वगळणी करण्याचे आव्हान एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांनी यशस्वीपणे पेलले! जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षाचे नायब तहसीलदार सुनील आहेर, एके नितीन बढे यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मतदारसंघनिहाय वगळणी
बुलडाणा ः 17939
चिखली ः 10076
सिंदखेडराजा ः 6034
मेहकर ः 1561
मलकापूर ः 803
खामगाव ः 3074
जळगाव जामोद ः 5155