सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्‍यू; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुनगाव (ता. जळगाव जामाेद) येथील शेतकरी रामदास देविदास सोनटक्के (४६) यांचा शेतात काम करताना सर्पदंश होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला.१४ ऑगस्टला शेतात ठिबकच्या नळ्या दुरुस्त करताना हा सर्पदंश झाला होता. त्यांनी तातडीने आपले भाऊ गजानन सोनटक्के यांना माहिती दिली. त्यांनी रामदास यांना तातडीने जळगाव जामोदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. …
 
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्‍यू; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सुनगाव (ता. जळगाव जामाेद) येथील शेतकरी रामदास देविदास सोनटक्‍के (४६) यांचा शेतात काम करताना सर्पदंश होऊन उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला.
१४ ऑगस्‍टला शेतात ठिबकच्‍या नळ्या दुरुस्‍त करताना हा सर्पदंश झाला होता. त्‍यांनी तातडीने आपले भाऊ गजानन सोनटक्‍के यांना माहिती दिली. त्‍यांनी रामदास यांना तातडीने जळगाव जामोदच्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रात दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी खामगावच्‍या खासगी रुग्‍णालयात हलवले होते. २१ ऑगस्‍टला त्‍यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.