…तर बँका, फायनान्स कंपन्यांमुळे जिल्ह्यात आत्महत्या वाढतील; शिवसंग्रामला भीती, प्रशासनाला केले सावध!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः वाढते कोरोनाचे संकट आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोटे, मोठे व्यवसाय बंद आहेत. अनेकांवर पुन्हा बेरोजगारीची तलवार कोसळली आहे. व्यवसायिक, शेतकरी, मजूर, कामगार सारेच हवालदील आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे बँकेकडून किंवा फायनस कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते सध्या त्यांना भरणे अवघड झाले आहे. दुसरीकडे बँका, फायनान्स कंपन्या कर्जवसुलीसाठी त्यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांना मानसिक त्रास देत आहेत. यातून आत्महत्या वाढीस लागू शकतात. अशा परिस्थितीत शासनाने त्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. बँका, फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी शिवसंग्राम संघटनेने केली आहे. तालुकाध्यक्ष राजेश इंगळे यांच्या नेतृत्त्वात तहसीलदार सारिका भगत यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी जहीर खान पठाण, अमजत खान, चंद्रभान झिने, संतोष हिवाळे, अयाज पठाण उपस्थित होते.