बुलडाण्याच्या सुपूत्राची भारताला “सुवर्ण’भेट!; स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भेदले लक्ष्य!
यबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्रोकला (पोलंड) येथे पार पडलेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने अमेरिकेला ३-१ अशी धूळ चारली. विशेष म्हणजे भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या त्रिसदस्यीय संघात बुलडाण्याचा सुपूत्र मिहीर नितीन अपार (१६) याचा समावेश आहे. सामन्यात भारतासाठी शेवटचा सुवर्णवेध साधण्याचा बहुमान मिहीरला मिळाला. मिहीर बुलडाण्यातील …
Aug 14, 2021, 21:36 IST
यबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः व्रोकला (पोलंड) येथे पार पडलेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात भारताने अमेरिकेला ३-१ अशी धूळ चारली. विशेष म्हणजे भारताला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या त्रिसदस्यीय संघात बुलडाण्याचा सुपूत्र मिहीर नितीन अपार (१६) याचा समावेश आहे. सामन्यात भारतासाठी शेवटचा सुवर्णवेध साधण्याचा बहुमान मिहीरला मिळाला. मिहीर बुलडाण्यातील प्रबोधन विद्यालयाचा विद्यार्थी असून, यंदा दहावीत आहे. त्याच्यासह भारतीय संघात दलाल कौशल आणि साहिल चौधरी या खेळाडूंचा सहभाग होता. मिहीरचे आई- वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. बुलडाण्यातील चंद्रकांत इलग हे मिहीरचे प्रशिक्षक आहेत. त्याने यशाचे श्रेय आई, वडील, आजोबा व प्रशिक्षकांना दिले.