ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता; पण महाराष्ट्रीयन असल्याने डावलले!

मनमाड : वेगवेगळ्या क्रीडा संघटनांत वाद होतात. प्रादेशिकता कधी कधी विकासाच्या, यशाच्या आड येते. आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळेल यांना हा अनुभव आला आहे. त्यांनी स्वतः आपल्यात पात्रता असूनही केवळ महाराष्ट्रीयन असल्याने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा गंभीर आरोप केला आहे. भोकनळ यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकानयनात महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे. अचानक …
 

मनमाड : वेगवेगळ्या क्रीडा संघटनांत वाद होतात. प्रादेशिकता कधी कधी विकासाच्या, यशाच्या आड येते. आंतरराष्ट्रीय रोईंगपट्टू दत्तू भोकनळेल यांना हा अनुभव आला आहे. त्यांनी स्वतः आपल्यात पात्रता असूनही केवळ महाराष्ट्रीयन असल्याने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा गंभीर आरोप केला आहे. भोकनळ यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नौकानयनात महाराष्ट्राचा झेंडा फडकावला आहे.

अचानक त्यांनी सैन्यदलाचा राजीनामा दिला आहे. फेडरेशनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रीयन असल्यामुळे माझ्याबाबत भेदभाव करण्यात आला. माझ्यावर अन्याय झाला, असा आरोप त्यांनी केला. ऑलिम्पिक पदक मिळवण्याची माझी क्षमता असूनही अचानक मला शिबिरातून काढण्यात आले. त्यामुळे मला ऑलिम्पिक स्पर्धेसाठीच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होता आले नाही, असा आरोप दत्तू भोकनळ यांनी केला. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं या प्रकाराची दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दत्तू भोकनळ हा 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रोइंग प्रकारात पात्र ठरलेला एकमेव भारतीय खेळाडू होता. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही या छोट्याशा गावचे ते आहेत. त्यांनी नौकानयन या क्रीडाप्रकारात भारताचं नाव उज्वल केलं आहे. दत्तू यांनी 2014 मध्ये राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली. 2015 मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तू यांनी सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदकावर नाव कोरले.