BREAKING वीरेंद्र सेहवाग बुलडाण्यात येणार..! कधी अन् केव्हा? काय आहे स्पेशल कारण.....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारताचा माजी सलामीवीर स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग बुलढाणा शहरात येणार आहे. तमाम क्रिकेट रसिकांसाठी ही अत्यानंदाची बातमी आहे.. बुलढाण्यात सुरू असलेल्या धर्मवीर आमदार चषकाच्या अंतिम सामन्यासाठी वीरेंद्र सेहवाग उपस्थित राहणार आहे..
बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर ३१ जानेवारीपासून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. हा स्पर्धेचा अंतिम सामना ९ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी सलामीवी , विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग उपस्थित राहणार आहे. यामुळे बुलडाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार मैदानात गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे...