उमेश यादवला कन्यारत्न

नवी दिल्ली ः जलद गोलंदाज उमेश यादवला 2021 सालच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली आहे. ही गोड बातमी त्याने सोशल मीडियावरुन सर्वांनी दिली. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसर्या लढतीत उमेश यादव जखमी झाला होता. दुखापतीमुळे उमेश उर्वरित दोन कसोटी मालिका खेळू शकणार नाही. तो भारतात परतला असून बेंगळुरू …
 

नवी दिल्ली ः जलद गोलंदाज उमेश यादवला 2021 सालच्या पहिल्याच दिवशी मुलगी झाली आहे. ही गोड बातमी त्याने सोशल मीडियावरुन सर्वांनी दिली. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसर्‍या लढतीत उमेश यादव जखमी झाला होता. दुखापतीमुळे उमेश उर्वरित दोन कसोटी मालिका खेळू शकणार नाही. तो भारतात परतला असून बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम करणार आहे.