संविधान बदलण्याची संघात आजवर चर्चा नाही!; संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला ‘बुलडाणा लाइव्ह’ कार्यालयात!!; आणिबाणी ते केजरीवाल… विशेष मुलाखतीतून मांडली संघाची भूमिका

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संविधानाच्या आधारावरच देश चालतो. आपले संविधान श्रेष्ठ आहे. संघावर केले जाणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. संविधान बदलणे याविषयावर संघात आजपर्यंत कधीच चर्चा झाली नाही, असे स्पष्टोक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांनी दिली. “बुलडाणा लाइव्ह’ कार्यालयात थेट – भेट कार्यक्रमात जिल्हा …
 
संविधान बदलण्याची संघात आजवर चर्चा नाही!; संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला ‘बुलडाणा लाइव्ह’ कार्यालयात!!; आणिबाणी ते केजरीवाल… विशेष मुलाखतीतून मांडली संघाची भूमिका

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संविधानाच्या आधारावरच देश चालतो. आपले संविधान श्रेष्ठ आहे. संघावर केले जाणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत. संविधान बदलणे याविषयावर संघात आजपर्यंत कधीच चर्चा झाली नाही, असे स्‍पष्टोक्‍ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व संघ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला यांनी दिली. “बुलडाणा लाइव्ह’ कार्यालयात थेट – भेट कार्यक्रमात जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. संघ आणि भाजपवर नेहमी संविधान बदलणार असल्याचा आरोप होतो, त्‍यावर त्‍यांनी यावेळी स्‍पष्टीकरण दिले.

तत्‍पूर्वी लाइव्ह ग्रुपचे समूह सल्लागार मनोज सांगळे यांनी लक्ष्मीनारायण भाला यांचे स्वागत केले. राजकीय फायदा उचलण्यासाठी समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी संघावर आरोप करण्यात येतात, असे यावेळी श्री. भाला म्‍हणाले. देशात अराजकता निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेणे हाच एकमेव उद्देश आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा आहे. देशात जिथे जिथे आम आदमी पार्टी आणि केजरीवाल जातील. तिथे अराजकता निर्माण होईल. देशवासीयांनी अराजकता निर्माण करणाऱ्या केजरीवाल यांच्यापासून सावध रहावे, असे मतही त्‍यांनी मांडले.

आणिबाणी म्हणजे लोकशाहीवरील कलंक
इंदिरा गांधींनी देशावर लावलेली आणिबाणी म्हणजे लोकशाहीवरील कलंक होता. या काळात पश्चिम बंगालमध्ये अनिमेष गुप्त हे नाव धारण करून आणिबाणीच्या विरोधात केलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. आपल्या नावाचा अटक वॉरंट निघाला होता. मात्र नाव बदलल्यामुळे अटक टाळून आणिबाणीच्या विरोधात जनभावना तयार करता आली, असे ते म्हणाले.

केंद्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रहिताचे….
केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून तयार केले आहे. शिक्षण कशासाठी घ्यायचे तर ते राष्ट्राच्या हितासाठी घ्यायचे हा हेतू समोर ठेवून हे शिक्षा धोरण ठरविण्यात आल्याचे ते म्हणाले.

सकारात्मक पत्रकारिता व्हावी
देशाला सकारात्मक पत्रकारितेची गरज आहे. केवळ नकारात्मक गोष्टींचीच बातमी होते ही मानसिकता पत्रकारांनी बदलली पाहिजे. लोकशाहीच्या तीन स्तंभावर लक्ष ठेवण्याचे काम पत्रकारांनी करावे. मात्र पत्रकार स्वतःला चौथा स्तंभ म्हणून घेतात त्यामुळे गडबड होते, असे श्री. भाला म्हणाले.

मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः