बुलडाण्यात आकर्षक, दर्जेदार फर्निचरचे दालन “ऋषीप्रसाद’चा शुभारंभ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड रोडवरील सागवन फाटा येथील उल्हास चौकात ऋषीप्रसाद फर्निचरचा शुभारंभ काल, २० ऑगस्टला सकाळी श्री. श्री. १००८ हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराजांच्या हस्ते झाला. बुलडाणा शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारचे आकर्षक, दर्जेदार व टिकाऊ फर्निचर मिळणारे हे भव्य दालन आहे. दालनाला आमदार संजय रायमूलकर, बुलडाणा लाइव्हचे संचालक मनोज सांगळे, डॉ. विजय …
 
बुलडाण्यात आकर्षक, दर्जेदार फर्निचरचे दालन “ऋषीप्रसाद’चा शुभारंभ

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धाड रोडवरील सागवन फाटा येथील उल्‍हास चौकात ऋषीप्रसाद फर्निचरचा शुभारंभ काल, २० ऑगस्‍टला सकाळी श्री. श्री. १००८ हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराजांच्‍या हस्‍ते झाला. बुलडाणा शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी सर्व प्रकारचे आकर्षक, दर्जेदार व टिकाऊ फर्निचर मिळणारे हे भव्‍य दालन आहे.

दालनाला आमदार संजय रायमूलकर, बुलडाणा लाइव्हचे संचालक मनोज सांगळे, डॉ. विजय खोलाडे, प्रा. विजय रायमल, सतीश शिंदे, सौ. अलका सुरोशे, दयानंद थोरहाते, सौ. आशाताई इंगळे, प्रकाश वाळवंद, सुभाष बोराडे, समाधान इंगळे, समाधान सुरोशे यांच्‍यासह मान्यवरांनी भेट दिली व सदिच्‍छा व्‍यक्‍त केल्या. ऋषी फर्निचर वर्क्स दालनात सागवन डोअर्स, सागवानी देवघर, सागवन चौकट, सीएनसी कार्विन, फायबर डोअर्स, लॅमिनेट डोअर्स, लाकडी रिलिंग, सोफा सेट, बॉक्‍स पलंग आदींसह अन्य फर्निचर दर्जेदार आणि अत्‍यंत वाजवी दरात उपलब्‍ध आहे.

दालनाचे मालक गजानन बोराडे हे गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. त्‍यांचे पूर्वी धाड नाक्‍यावर ऋषीप्रसाद फर्निचर नावानेच छोटासा फर्निचर व्यवसाय होता. मात्र मेहनत आणि गुणवत्तेने त्‍यांचा लौकिक वाढत गेला आणि आजघडीला एक भव्य दालन सागवन फाट्यावर उभे राहिले आहे. गं. भा. सुलोचनाबाई नवनाथ बोराडे, गजानन बोराडे, सौ. छाया बोराडे, प्रशांत बोराडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ऋषीप्रसाद फर्निचरचा संपर्क क्रमांक ः 8329857437

बुलडाण्यात आकर्षक, दर्जेदार फर्निचरचे दालन “ऋषीप्रसाद’चा शुभारंभ
ऋषीप्रसाद फर्निचरचा शुभारंभ करताना श्री. श्री. १००८ हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज.