गुडघेदुखीने हैराण? पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलचे रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे उद्या, १८ जुलै रोजी बुलढाण्यात...

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गुडघेदुखी, कंबरदुखी, खुब्याचे विकार, लिगामेंट इन्जुरी किंवा चालताना होणाऱ्या त्रासाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल्सच्या वतीने रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची सुपरस्पेशालिटी ओपीडी शनिवार, 18 जुलै 2026 रोजी बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

 ​​​

या ओपीडीमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुडघ्यावरील उपचार, सांधेरोपण तसेच हाडे व सांध्यांच्या विविध आजारांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे. रुग्णांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पुढील उपचारांचे नियोजनही करण्यात येणार आहे.

या विशेष ओपीडीमध्ये गुडघेदुखी व गादी (कार्टिलेज) फाटणे, खुब्याचे विकार, पायाला बाक येणे, पाठदुखी, कंबरदुखी, चालताना होणारा त्रास तसेच लिगामेंट इन्जुरी व खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींवर तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.

ही ओपीडी शनिवार, 18 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत लद्धड हॉस्पिटल, वानखेडे लेआउट, सुवर्ण नगर, गजानन महाराज मंदिराच्या मागे, बुलढाणा येथे होणार आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी काऊन्सेलर सचिन पवार यांच्याशी 9673859185 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. गुडघे व सांध्यांच्या समस्यांवर अत्याधुनिक रोबोटिक उपचारांचा लाभ घेण्यासाठी ही रुग्णांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे.