बुलडाण्याची बाजारपेठ फुलली... पण व्यापाऱ्यांना प्रतीक्षा "त्‍यांची'!

 
/ 3

अतिवृष्टीतून हाती आलेल्या थोड्या फार सोयाबीनला भाव मिळत नसल्याने चिंताग्रस्‍त शेतकऱ्याची दिवाळी यंदा फारशी उजळलेली नाही, असे म्‍हणावे लागेल. बुलडाणा कर्मचाऱ्यांचे शहर असल्याने त्‍यांची वर्दळ वाढली आहे. त्‍यामुळे व्यापाऱ्यांना किंचित का दिलासा आहे. शेतकऱ्यांना सरकारने मदत करून सोयाबीनला चांगला भाव मिळेल यासाठी हालचाली कराव्यात, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनीही व्‍यक्‍त केली असून, शेतकऱ्यांच्‍या बाजारपेठेतील आगमनाकडे त्‍यांचेही डोळे लागल्याचे दिसून आले.

/ 3

दिवाळीच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. पण तरीही हे चित्र समाधानकारक म्‍हणता येणार नाही. कोरोनाच्‍या संकटातून स्वतःला कसेबसे सावरलेले नागरिक बाजारात खरेदीसाठी आल्यानंतरही बारीक विचार करूनच खर्च करताना दिसत आहेत. अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळत आहेत. तरीही देवाच्या कृपेने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बरे वातावरण आहे, असे म्‍हणावे लागेल. ग्राहकांची परिस्थिती नसल्याने त्‍यांच्‍याकडून फारशी अपेक्षा करणेही योग्य नाही. ही परिस्‍थिती नक्कीच बदलेल.

/ 3

मार्केट पूर्णपणे सुरू झाले आहे. ग्राहकांची वर्दळही वाढली आहे. मात्र खिशात फारसा पैसा नसल्याने ग्राहकी तशीच कमीच आहे. कोरोनाच्या आर्थिक संकटातून अनेेक जण अजूनही सावरलेले नाहीत. शेती उत्‍पादनाला चांगला दर न मिळाल्याने शेतकरीही चिंतित आहे. त्‍याचाही परिणाम बाजारावर झाला आहे. ग्रामीण भागातील जो वर्ग आमच्याकडे येत होता, त्‍यातले ५० टक्‍केच लोक येत आहेत. मागच्या वर्षी नसल्यासारखी दिवाळी होती. यावेळेस थोडा उत्साह आहे. मी समाधानी आहे. बाजारपेठ पूर्ववत होण्यासाठी आणखी थोडे थांबावे लागेल.

/ 3

दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग सुरू असल्याने लोक आता प्‍लॅनिंग करून खरेदी करत आहेत. त्‍यामुळे बाजारात ग्राहक दिसत असले तरी बजेटमध्येच खरेदी करताना दिसत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जी मदत मिळायला पाहिजे, ती मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकरी विचार करतोय की सोयाबीन विकल्यावर काही घेऊ. पण त्याच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झालाय. त्‍यामुळे शेतकरी वर्गही बाजारपेठेत यंदा कमीच दिसतोय. ग्रामीण भागातील ग्राहक दसऱ्यापासून कमी झाला आहे. मागच्या वर्षापासून ते आताच्या मार्केटमध्ये बघितले तर ग्राहक वर्ग हुशार झाला आहे. कमी खर्चामध्ये खरेदी करत आहे. शेतकऱ्यांना चांगली मदत झाली तर दिवाळी, भाऊबीजही चांगली होईल. कोरोना कमी झाला असला तरी मास्क व सॅनिटायझरचा वापर नियमित ठेवायला हवा.

/ 3

गेले वर्ष सोडले तर त्‍याआधी येणारा ग्राहक आणि या दिवाळीला येणाऱ्या ग्राहकांत मोठी तफावत जाणवत आहे. केवळ ३० टक्‍के वर्गच खरेदीसाठी बाहेर पडला आहे. कोरोनाच्या संकटातून बाजारपेठ सावरतेय हे आशादायी चित्र आहे. ग्राहकांच्‍या गर्दीत शेतकरी वर्ग अत्यल्प आहे. सध्या सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४८५०० रुपये २४ कॅरेट आणि ४७००० रुपये २२ कॅरेट असा आहे. चांदी ६७५०० रुपये किलो आहे.

/ 3

कपडे खरेदी करण्यासाठी आलो. मार्केट चांगल्याप्रकारे सुरू झाले आहे. पण सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकरी मार्केटमध्ये येण्यास धजावत नाहीये. शेतकऱ्यांकडे खरेदीसाठी पैसे नाहीत. ग्रामीण भागात पाहिजे तसा रोजगार नसल्यामुळे सुध्दा ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र तरीही मागच्या वर्षीच्‍या तुलनेत आता मार्केट चांगल्या रितीने सुरू झालेले दिसून येतेय. - गोपाल जाधव, रा. रायरा ता. मोताळा

From around the web