गुडघेदुखीला करा रामराम! आता अत्याधुनिक रोबोटिक उपचारांची संधी; पुणे येथील रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. शरद साळोखे यांचे बुलढाणा व जालना येथे विशेष मार्गदर्शन शिबिर! २० आणि २१ जून तारीख लक्षात ठेवा....
Jun 13, 2026, 12:26 IST
बुलढाणा, प्रतिनिधी(वाणिज्य प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):गुडघेदुखी, सांध्यांचे विकार, लिगामेंट इन्जुरी, पाठदुखी, कंबरदुखी तसेच खेळातील दुखापतींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. पुण्यातील नामांकित लोकमान्य हॉस्पिटल्स यांच्या वतीने अत्याधुनिक रोबोटिक सांधेरोपण तज्ञ डॉ. शरद साळोखे यांचे विशेष तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुडघ्यावरील उपचार व सांधेरोपण शस्त्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. साळोखे हे दि. २० जून २०२६ रोजी बुलढाणा आणि दि. २१ जून २०२६ रोजी जालना येथे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
या शिबिरामध्ये गुडघेदुखी, गुडघ्याची गादी फाटणे, खुब्याचे विकार, पायाला बाक येणे, चालताना त्रास होणे, पाठदुखी, कंबरदुखी तसेच लिगामेंट इन्जुरी आणि खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींसंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. रुग्णांना त्यांच्या आजाराविषयी सविस्तर माहिती देऊन आधुनिक उपचार पद्धतींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
बुलढाणा येथील तपासणी शिबिर शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत लद्धड हॉस्पिटल, वानखेडे लेआउट, सुवर्ण नगर, गजानन महाराज मंदिरामागे, बुलढाणा येथे होणार आहे.
तर जालना येथील शिबिर रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत मातृत्व हॉस्पिटल, प्रियंका रेसिडेन्सी, नेत्रसेवा हॉस्पिटलजवळ, मंठा रोड, मंठा चौफुली, जालना येथे आयोजित करण्यात आले आहे.
गुडघेदुखी किंवा सांध्यांच्या समस्यांमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
लअधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क :
सचिन पवार (कौन्सिलर) – 9673859185