राजर्षी शाहू मल्टिस्टेटला सहकार गौरव पुरस्कार! सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट संस्थेचा मान; शिर्डी येथे फेडरेशन ऑफ मल्टिस्टेटचा पुरस्कार सोहळा संपन्न

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. पुणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार गौरव पुरस्कारावर राजर्षी शाहू मल्टिस्टेटने सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरले आहे. संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी १२ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत मान्यवरांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार स्वीकारला. 
शिर्डी येथील बुलढाणा अर्बन सहकार प्रशिक्षण केंद्रात गुरुवारी दुपारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. केंद्रीय सहकार सचिव डॉ.आशिष भूतानी यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी सहकार मंत्री सुभाषबाप्पू देशमुख, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे,महाराष्ट्र राज्य मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशअण्णा वाबळे,विभागीय निबंधक नाशिक संभाजीराव निकम, जिल्हा उपनिबंधक अहमदनगर गणेश पुरी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनात राजर्षी शाहू मल्टिस्टेटने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर दिला आहे. ग्राहकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासह सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे ऋण फेडण्याचा संस्थेचा कायम प्रयत्न राहिलाय. संस्थेच्या चांगल्या कामाची विविध स्तरावर दखल घेतली गेली असून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मिळलेल्या सहकार गौरव पुरस्काराच्या रुपाने त्यात आणखी भर पडलीय. 
ठेवीदार, ग्राहक, खातेदार, सभासद आणि शुभचिंतकांसोबत हा गौरवाचा क्षण साजरा करतांना आनंद होत असून हा पुरस्कार त्यांना समर्पित केल्याची भावना संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांनी व्यक्त केली. तर पुरस्कारामुळे संस्थेच्या सेवाकार्याची जबाबदारी दुपटीने वाढल्याचे त्यांनी सांगितले.