करिअर पॉईंट, बुलडाणा येथे ११वी NEET, JEE, CET बॅचसाठी ओरिएंटेशन सत्र उत्साहात!पालक-विद्यार्थी-शिक्षक त्रिसूत्री सहकार्यातून गुणवत्तेच्या शिखराकडे वाटचाल

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून करिअर पॉईंट, बुलडाणा येथे इयत्ता ११वी NEET, JEE आणि CET बॅचसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी ओरिएंटेशन सत्र उत्साहात संपन्न झाले.

बुलढाणा

रविवार सकाळी ९.३० वाजता आयोजित या सत्राला विद्यार्थ्यांसह पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. सत्रात संस्थेच्या शैक्षणिक व व्यवस्थापन पथकाने विद्यार्थ्यांच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा आढावा देत अभ्यास पद्धती, शिस्त आणि मार्गदर्शनाच्या विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली.
सत्रातील ठळक मुद्दे असे :
* विषय शिक्षकांशी थेट ओळख : प्रत्येक विषयाचे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची थेट ओळख करून देण्यात आली.
* स्पर्धा परीक्षा अभ्यास नियोजन : NEET, JEE आणि CET परीक्षांसाठी वर्षभराचा अभ्यास आराखडा पालक व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आला.
बुलढाणा
* नियमित टेस्ट व परीक्षाभिमुख साहित्य : चाचणी पद्धती, विश्लेषण आणि पूरक अध्ययन साहित्याची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली.
* वर्गशिस्त व वेळेचे पालन : शिस्तबद्धता, उपस्थिती व वेळेचे महत्व अधोरेखित करण्यात आले.
* शंका निरसन व्यवस्था : विद्यार्थ्यांच्या शंका वेळीच सोडवण्यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
* पालक सहभागाचे महत्व : विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालकांनी नियमित फॉलोअप घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
* प्रश्नोत्तर सत्र : पालक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट आणि समर्पक उत्तरे देण्यात आली.
या कार्यक्रमात पालक-विद्यार्थी-शिक्षक या त्रिसूत्री सहकार्यातून शिक्षणात गुणवत्ता साधण्याचा निर्धार करण्यात आला. करिअर पॉईंटच्या वतीने सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, सुसूत्र अभ्यासपद्धतीची ओळख करून देणे आणि योग्य मार्गदर्शनाची दिशा देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शैक्षणिक मार्गदर्शनाची ही वाटचाल विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याकडे नेणारी ठरेल, असा विश्वास यावेळी संस्थेने व्यक्त केला.