गोदरेज मका 105 : शेतकऱ्यांची खात्रीशीर प्रगती! प्रगतशील शेतकरी उमेशभाऊ राजपूत यांचा यशाचा ‘कॉलिटी + कॉन्टिटी’ मंत्र....

 
 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या हमखास प्रगतीचा मका वाण म्हणून गोदरेज मका 105ने गेल्या काही वर्षांत ठसा उमटवला आहे. एकदा लागवड केली की यश निश्चित असा विश्वास अनेक प्रगतशील शेतकरी व्यक्त करतात. इतर मका वाणांच्या तुलनेत लवकर उत्पादन देणे, अधिक उत्पन्न, अवकाळी हवामानाचा कमी परिणाम आणि चांगली दाण्याची गुणवत्ता यामुळे हे वाण आज शेतकऱ्यांचा आवडता पर्याय बनले आहे.
मोताळा तालुक्यातील खेडी परिसरातील प्रगतशील शेतकरी व कृषी विक्रेते उमेशभाऊ राजपूत (शेतकरी कृषी सेवा केंद्र, लालमाती) गेल्या 5 वर्षांपासून गोदरेज मका 105 ची सातत्याने लागवड करतात. कपाशी आणि तुरीचे क्षेत्र मोकळे झाल्यावर ते तत्काळ या वाणाची पेरणी करून विक्रमी उत्पादन काढतात.
विक्रमी उत्पादनाचा पक्का पुरावा
उमेशभाऊ राजपूत यांनी मागील वर्षी रब्बीत प्रति एकर 53 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन काढून गावासह परिसरात आदर्श निर्माण केला.
त्यांचे म्हणणे स्पष्ट हा मका इतर वाणांपेक्षा 20–25 दिवस लवकर येतो. अवकाळी पाऊस, वादळ किंवा खराब हवामानात हा मका सहज पडत नाही. दाण्याची कॉलिटी व कॉन्टिटी दोन्ही उत्कृष्ट.
 लालमाती – पन्हेरा परिसरातील यशकथा
राजपूत यांनी खेडी, लालमाती, पन्हेरा परिसरात शेतकऱ्यांना 105 वाणाची ओळख करून दिली. आज या भागात ते दरवर्षी १० मेट्रिक टनांहून अधिक मका डिसेंबर-जानेवारीमध्ये विकतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार मी 5 वर्षांत एकरी 40 क्विंटलपेक्षा कमी उत्पादन कधीच घेतले नाही. या वर्षीही शेतकऱ्यांनी गोदरेज 105 लावून उत्पादन दुप्पट वाढवावे.”
  उशिरा लागवड आणि अवकाळी हवामानासाठी उत्तम
उमेशभाऊ राजपूत यांनी सल्ला दिला की, “अवकाळी हवामानाचा अंदाज लक्षात घेता, उशिरा लागवडीसाठी गोदरेज 105 हा सर्वोत्तम पर्याय आहे. शेत तयार झाल्यावर हे वाण लावा आणि हमखास उत्पादन वाढवा.”
 “नाद करायचा नाय… कॉलिटी आणि कॉन्टिटी मंजे— गोदरेज 105!”
आपलाच,
उमेशभाऊ राजपूत
प्रगतशील शेतकरी व कृषी विक्रेता
शेतकरी कृषी सेवा केंद्र, लालमाती