JEE च्या निकालात करिअर पॉईंट कोटा बुलढाणा शाखेचा डंका! विद्यार्थ्यांनी गाठले यशाचे शिखर;वेदांत, भाग्यश्री, प्रसाद अन् आणखी बरेच काही...

 
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): करिअर पॉईंट आणि यशाची हमखास खात्री हा आता पॅटर्नच बनला आहे. बुलढाण्यासारख्या शहरात उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांमुळे, तज्ञ मार्गदर्शकांमुळे अनेक विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहेत.नुकत्याच लागलेल्या JEE MAINS (JAN -2025) च्या निकालात देखील करियर पॉईंट कोटाच्या बुलढाणा शाखेने आपली उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखली आहे..अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत आणि नजरेत भरेल असे यश मिळवले आहे..वेदांत रोठे, कु. भाग्यश्री तायडे, प्रसाद ताठे या विद्यार्थ्यांनी करिअर पॉईंट कोटा बुलढाणा शाखेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे...
वेदांत रोठे (94.98 %tile), कु. भाग्यश्री तायडे (94.00%tile) तर प्रसाद ताठे (89.00%tile) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या तिघांसह अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पाल्यांचा करिअर पॉईंट कोटा बुलढाणा शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.