करियर पॉईंट बुलढाणाची घवघवीत कामगिरी! JEE Advance 2025 साठी 6 विद्यार्थी पात्र
Updated: Apr 24, 2025, 12:01 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या करियर पॉईंट बुलढाणा संस्थेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. संस्थेतील सहा विद्यार्थ्यांनी JEE Mains 2025 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत JEE Advance 2025 साठी पात्रता मिळवली आहे.
पात्र ठरलेले विद्यार्थी
वेदांत राठे, कु. भाग्यश्री तायडे, प्रसाद ताठे, प्रणय वाघमारे, कु. गौरी पोपळघट, कु. सुजाता सिरसाठ, प्रतिक्षा बेदरकर, सार्थक गवई, प्रणव टेकाळे, वेदिका भोंडे आणि ओम घोटी– यांनी आपल्या सातत्यपूर्ण मेहनतीने आणि संस्थेच्या मार्गदर्शनाने हा टप्पा गाठला आहे. त्यांच्या या उज्वल यशाने त्यांनी करिअर पॉईंट बुलढाणा आणि पालकांचा अभिमान वाढवला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबरच करियर पॉईंट बुलढाणा च्या NCERT आधारित अभ्यासक्रम, स्टॅटेजिक मेंटरशिप प्रोग्राम, अनुभवी शिक्षकवर्ग आणि नियमित टेस्ट अॅनालिसिस यांचा मोलाचा वाटा आहे, असे संस्थेचे संस्थापक सांगतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व मोटिवेशन दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये योग्य दिशा मिळाली.
संस्थेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष सत्कार व अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, NEET, JEE, MHT-CET तसेच Pre-Foundation कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करिअर पॉईंट बुलढाणा च्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष संपर्क साधा. पत्ता : गंगा पार्क जवळ, विष्णुवाडी, बुलढाणा, संपर्क : 9604092327