NEET-JEE चा पाया मजबूत करण्याची संधी! करिअर पॉईंट कोटा, बुलडाण्यात ‘फाउंडेशन बॅच’ आजपासून सुरू...
Jun 27, 2025, 09:22 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळख असलेल्या ‘करिअर पॉईंट कोटा’ संस्थेच्या फाउंडेशन बॅचेस आता बुलडाण्यातही सुरू झाल्या आहेत. डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. आजपासून ही विशेष बॅच औपचारिकपणे सुरू झाली असून, जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात यामुळे नवे दालन खुले झाले आहे.
इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन बॅच राबविण्यात येत आहे. NEET आणि JEE या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचा पाया मजबूत करण्यासाठी ही बॅच महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना विषयांचा सखोल अभ्यास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्पर्धात्मक तयारी दिली जाणार आहे.
‘करिअर पॉईंट कोटा’ने यापूर्वीही दर्जेदार निकालांच्या माध्यमातून बुलडाण्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. लातूर किंवा कोटा या शैक्षणिक केंद्रांकडे पाहणाऱ्या पालक व विद्यार्थ्यांसाठी आता हाच दर्जा बुलडाण्यात उपलब्ध होणार आहे. स्पर्धा परीक्षांसाठीचा पाया घट्ट करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी करिअर पॉईंट कोटाची फाउंडेशन बॅच एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.