भाड्याची दोन दुकाने ते स्वमालकीचे सुसज्ज शोरूम! सुनील वानखडे ठरले व्यवसायातील ‘हिरो’!

आयटीआयमधून डिझेल मेकॅनिकचा डिप्लोमा घेतलेल्या सुनील रामभाऊ वानखडे यांना पुढे काय करायचे असा प्रश्न आजपासून सुमारे 16 वर्षांपूर्वी पडला! त्याचे उत्तर त्यांनी स्वतःचा व्यवसाय असे स्वतःलाच दिले. या निर्णयाला भगवंताने आशीर्वादरूपी कौल दिला अन् वडिलांनी प्रोत्साहन दिले. कुटुंब पाठीशी उभे राहिले. खामगाव मार्गावरील हिरो कंपनीच्या दुर्गाश्री मोटर्स या भव्य शोरूमची ही पार्श्वभूमी नव्हे यशोगाथा आहे…! …
 
भाड्याची दोन दुकाने ते स्वमालकीचे सुसज्ज शोरूम! सुनील वानखडे ठरले व्यवसायातील ‘हिरो’!

आयटीआयमधून डिझेल मेकॅनिकचा डिप्लोमा घेतलेल्या सुनील रामभाऊ वानखडे यांना पुढे काय करायचे असा प्रश्‍न आजपासून सुमारे 16 वर्षांपूर्वी पडला! त्याचे उत्तर त्यांनी स्वतःचा व्यवसाय असे स्वतःलाच दिले. या निर्णयाला भगवंताने आशीर्वादरूपी कौल दिला अन् वडिलांनी प्रोत्साहन दिले. कुटुंब पाठीशी उभे राहिले. खामगाव मार्गावरील हिरो कंपनीच्या दुर्गाश्री मोटर्स या भव्य शोरूमची ही पार्श्‍वभूमी नव्हे यशोगाथा आहे…!

भाड्याची दोन दुकाने ते स्वमालकीचे सुसज्ज शोरूम! सुनील वानखडे ठरले व्यवसायातील ‘हिरो’!

पण ही यशोगाथा, सुस्वभावी सुनीलभाऊंची यशोगाथा इतक्या सहजासहजी आकारास आली नाही. त्यामागे त्यांचा निर्धार, त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, मनी बाळगलेली जिद्द, केलेला दृढ संकल्प, त्याला देवादिकांचे आशीर्वाद, ताकदीने पाठिशी उभे राहिलेले पिताश्री रामभाऊजी वानखडे, ग्राहकांचा अतूट विश्‍वास, उत्तम सेवा या सर्व घटकांचे एकत्रीकरण झाल्यावर यशस्वी व्यवसाय कथा पूर्ण झाली. उत्तम सेल सर्व्हिस, माफक दरात मिळणारे स्पेअर पार्ट्स, ग्राहकांना मिळणारा सल्ला व मार्गदर्शन, कमीत कमी व्याजात वाहन घेण्यासाठी मिळणारे फायनान्स, उत्तम सर्व्हिसिंग आदी एक ना अनेक सुविधा असल्याने दुर्गाश्री मोटर्स ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनले. या शोरूममध्ये सुपरहिट हिरो कंपनीच्या सर्व गाड्या (मॉडेल्स) उपलब्ध आहेत. जोडीला भरगच्च सुविधा, सुनीलभाऊ व त्यांच्या सहकार्‍यांची प्रेमळ, विनम्र वागणूक आहे. यामुळे संतनगरी व परिसरातील रहिवाशांना अन्य ठिकाणी गाडी घेण्यासाठी जायची गरजच राहिली नाहीये.

भाड्याची दोन दुकाने ते स्वमालकीचे सुसज्ज शोरूम! सुनील वानखडे ठरले व्यवसायातील ‘हिरो’!

अगदी प्राथमिक अवस्थेत सुरू झालेले त्यांच्या दुकानाचा आता पूर्ण कायापालट झाला आहे. स्वतःच्या जागेत सुरू असलेले त्यांचे लखलखते शोरूम शहरातील मुख्य व्यावसायिक प्रतिष्ठान ठरले आहे. सुमारे 7 वर्षांपूर्वी म्हणजे 29 डिसेंबर 2013 रोजी त्यांनी देवाच्या कृपेने व आई-वडिलांच्या आशीर्वादाने या शोरूममध्ये प्रवेश केला. तो सुवर्णदिन त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला, हे सांगताना सुनीलभाऊंच्या डोळ्यातून आजही नकळत आनंदाश्रू तरळून गेल्याचे दिसून आले. त्यातही ते आपला भूतकाळ, 16 वर्षांपूर्वीचे ते धडपडीचे दिवस विसरले नाहीये! ते सांगताना व बुलडाणा लाईव्हशी चर्चा करताना त्यांचा आवाज काहीसा गहिवरून आला. आपला व्यवसाय भाड्याच्या 2 दुकानांत सुरू झाल्याचे ते सांगतात, तेव्हा त्यांनी हिरो होंडाचे सर्व्हिस स्टेशन सुरू केले होते. आज त्या रोपट्याचा मोठा वेलू झाला अन् तो देवकृपे गगणावरी झेपावणार हे नक्कीच!