…इसका अंजाम मिलेगा!
बोगस कामे करणार्यांना नक्षलवाद्यांचा इशारा
गडचिरोली : नक्षलवादाची समस्या राज्याच्या काही जिल्ह्यांत अजूनही कायम आहे. नक्षलवादी शासकीय कामात अनेकदा अडथळे आणून काम बंद पाडतात. यावेळी नक्षलवाद्यांनी बोगस कामांविरोधात एल्गार पुकारला असून बोगस कामे बंद करा, अन्यथा त्याचा अंजाम वाईट होईल, असा थेट इशाराच स्थानिक प्रशासनाला दिला आहे. तशा आशयाचे बॅनर्स गडचिरोली जिल्ह्यात लागल्यामुळे सरकारी अधिकारी व काम करणार्या ठेकेदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात एका रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्याला नक्षलवाद्यांनी विरोध केला आहे. हे काम बोगस पद्धतीने होत आहे. त्याचा दर्जा चांगला नसल्याचा आक्षेप नक्षलवाद्यांनी घेतला आहे. हे बोगस काम तातडीने बंद करावे, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील व ते तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या परिसरात कापडी बॅनर लावून देण्यात आला आहे. या बॅनरवर भाकप माओवादी असे संघटनेचे नाव लिहिले आहे. नक्षलींनी याआधी विकास कामे करणार्या ठेकेदारांची वाहने जाळून टाकल्याच्या व कामगारांना हुसकावून लावल्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे नक्षलींच्या या इशार्यामुळे ठेकेदार, अधिकार्यांत अस्वस्थता पसरली आहे.