१३ तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझेंना रात्री १२ वाजता अटक

अंबानींच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याचे प्रकरणमुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अटक केली. त्याआधी शनिवारी दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास त्यांची चौकशी सुरू होती. रविवारीही त्यांची चौकशी सुरूच राहण्याची शक्यता आहे.वाझे यांच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे …
 

अंबानींच्या घराबाहेर स्फोटके आढळल्याचे प्रकरण
मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले वादग्रस्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास अटक केली. त्याआधी शनिवारी दिवसभर म्हणजे जवळपास १३ तास त्यांची चौकशी सुरू होती. रविवारीही त्यांची चौकशी सुरूच राहण्याची शक्यता आहे.वाझे यांच्या चौकशीतून काही धक्कादायक बाबी समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ठाण्याचे मृत व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी गेली काही महिने वाझे हेच वापरत होते. त्याच वाहनात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळली होती. त्याआधी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्यावेळीही वाझेंनी हीच गाडी वापरली होती. या सगळ्यांचे तार वाझे यांच्याशी जुळत असल्याने व न्यायालयानेही सकृतदर्शनी वाझेंच्याविरोधात पुरावे आढळल्याचे निरीक्षण नोंदवले होते. तसेच त्यांच्या अटकेला अंतरिम संरक्षण देण्यास नकार दिला होता. त्यामुळे वाझे यांच्या अटकेचा अंदाज बांधला जात होता.