सोबत काम करणाऱ्या मुलीला फिरायला नेऊन लॉजवर बलात्‍कार!

नाशिक ः आपल्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखविलं. तिला त्र्यंबकेश्वरमध्ये नेलं. हाॅटेलमध्ये असताना तिला गुंगीचं आैषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी आणि आरोपी हा एकाच ठिकाणी होते. त्यामुळं त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती; पण आरोपीनं मैत्रीचा घात केला. हे विकृत कृत्य केलं. राज्य सरकारनं पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. असं …
 

नाशिक ः आपल्यासोबत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखविलं. तिला त्र्यंबकेश्वरमध्ये नेलं. हाॅटेलमध्ये असताना तिला गुंगीचं आैषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी आणि आरोपी हा एकाच ठिकाणी होते. त्यामुळं त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती; पण आरोपीनं मैत्रीचा घात केला. हे विकृत कृत्य केलं.

राज्य सरकारनं पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. असं असताना एका युवकानं आपल्यासोबत काम करणाऱ्या मुलीला फिरायला नेण्याचं आमिष दाखविलं. पंचवटीहून हे दोघं एका दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरला गेले. आरोपीनं पीडितेला एका लॉजवर नेलं. तिथं तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. रोहित आनंद म्हसदे असं या नराधमाचं नाव आहे. तो पंचवटी येथील फुलेनगर परिसरातील रहिवासी आहे. खरंतर सध्या नाशिकमध्ये टाळेबंदी आहे. टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्र्यंबकेश्वर या पर्यटनस्थळी जाण्यास मनाई आहे. असं असताना आरोपीनं पंचवटी येथून पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर नेलं. पोलिसांची नजर चुकवून तो तिला घेऊन त्र्यंबकेश्वरला गेला आणि तिच्यावर अत्याचार केला.