सेक्सला महत्व न देणाऱ्या महिलांना लवकर मोनोपाॅज?
मुंबई ः सेक्सचे अनेक फायदे आहेत. सेक्समुळे कॅलरीज बर्न होतात. हृदय चांगले राहतं, त्वचा चांगली राहते. वैवाहिक जीवनात सेक्स एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करतं; पण अशा बऱ्याच महिला आहेत, ज्या सेक्सला फारसं महत्त्व देत नाहीत, जितकं द्यायला हवे. त्यामुळे अशा महिलांना मेनोपॉज लवकर येतो असं म्हटलं जातं; पण हे खरं आहे का, हे समजून घेतलं पाहिजे.
सेक्स करण्यात पुरुष जितके अॅक्टिव्ह असतात, तितक्या महिला नसतात. याबाबत अभ्यास करण्यात आला. यापैकी एक अभ्यासातून ही गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे 35 वर्षांनंतर महिला सेक्स्शुअली कमी अॅक्टिव्ह असतात त्यांना मेनोपॉज लवकर येतो. नियमित सेक्स करणाऱ्या महिलांना योग्य वयात मेनोपॉज येतो. ज्या महिला आठवड्यातून एकदा सेक्स करतात, त्यांना महिन्यातून केवळ एकदा सेक्स करणाऱ्या महिलांपेक्षा तुलानात्मक मेनोपॉज लवकर येण्याची शक्यता 28 टक्के कमी असते. सेक्स व्यवस्थित न केल्यामुळे मासिक पाळी वयाच्या आधी लवकर जाते. शरीराला आणि बदलत्या हार्मोन्समुळे जास्त त्रास होतो. 35 वर्षांवरील महिला सेक्स करत नाही. त्यामुळे त्यांचे शरीर ओव्युलेशन बंद करण्याचे संकेत देऊ लागते. त्यामुळे मेनोपॉज होऊ लागतो. किमान तीन हजार महिलांवर अभ्यास करण्यात आला असून ओव्युलेशन दरम्यान महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळेच साधारण 35 नंतर महिला जास्त प्रमाणात आजारी पडतात. त्याला कारण सेक्स करण्याकडे झालेले दुर्लक्ष. निरोगी आयुष्यासाठी सेक्स लाईफचा आनंद घ्यायलाच हवा. आरोग्य निरोगी राखण्यासाठी आठवड्यातून किमान एक दिवस तरी सेक्स करायला हवा.