सचिन वाझेंची पीपीई कीट घालून उलटतपासणी

अंबानींच्या बंगल्याबाहेर पांढरा सदरा घालून वाझेंना मारायला लावल्या चार फेर्या मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले वादग्रस्त निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) ३० मार्चपर्यंत पोलीस एनआयए कोठडी मिळाली आहे. उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरण तसेच उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहे स्फोटके सापडण्याच्या प्रकरणात एनआयए वाझे यांची चौकशी करत असून …
 

अंबानींच्या बंगल्याबाहेर पांढरा सदरा घालून वाझेंना मारायला लावल्या चार फेर्‍या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेले वादग्रस्त निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेची (एनआयए) ३० मार्चपर्यंत पोलीस एनआयए कोठडी मिळाली आहे. उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरण तसेच उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहे स्फोटके सापडण्याच्या प्रकरणात एनआयए वाझे यांची चौकशी करत असून त्याअनुषंगाने या प्रकरणातील वाझेंचा सहभाग वरचेवर स्पष्ट होत असून त्यांच्याविरोधात पुरावे आढळल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. वाझेंनी आतापर्यंत दिलेली माहिती, पुरावे व वस्तुस्थिती
यांची शहनिशा तपास यंत्रणेकडून केली जातआहे. त्याअनुषंगाने सचिन वाझे यांना पीपीई कीट व पांढरा सदरा घालून अंबानींच्या घराबाहरे चार वेळा चालवण्यात आले. त्यातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजची खातरजमा केली जात आहे. अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटके स्कॉपिओ कारमध्ये ठेवण्यात आली होती त्यावेळी सचिन वाझे तेथे हजर होते. पण त्याचवेळी तिथे एक इनोव्हा कारदेखील होती. या इनोव्हा कारमधून एक व्यक्ती पीपीई कीटमध्ये उतरली होती. ही व्यक्ती सचिन वाझे हेच आहेत का याचा तपास एनआएकडून घेतला जात आहे. त्यादृष्टीने एनआएने वाझेंना घटनास्थळी नेऊन घटना रिक्रिएट केली. ठाण्याचे मृत व्यापारी मनसुख हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी गेली काही महिने वाझे हेच वापरत होते. त्याच वाहनात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटके आढळली होती. त्याआधी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्यावेळीही वाझेंनी हीच गाडी वापरली होती. या सगळ्यांचे तार वाझे यांच्याशी जुळत असल्याने व न्यायालयानेही सकृतदर्शनी वाझेंच्याविरोधात पुरावे आढळल्याचे निरीक्षण नोंदवले होते.