संजय राऊत ७ वर्षांपासून करताहेत महिलेचा छळ!; पाळत, हेरगिरी, जीवे मारण्याचा प्रयत्‍न, धमक्‍या, हायकोर्टाने घेतली दखल

मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ७ वर्षांपासून आपला छळ करत असून, पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली आहेत. जिवानिशी मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला असून, शिविगाळ व धमक्या देतात, असा आरोप मुंबईतील एका मानसोपचार तज्ज्ञ महिलेने केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. महिलेने मुंबई हायकोर्टात या प्रकरणात रिटयाचिका दाखल करून न्यायाची मागणी केल्याने …
 

मुंबई (मुंबई लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे ७ वर्षांपासून आपला छळ करत असून, पाळत ठेवण्यासाठी माणसं लावली आहेत. जिवानिशी मारण्याचा प्रयत्‍नही त्‍यांनी केला असून, शिविगाळ व धमक्‍या देतात, असा आरोप मुंबईतील एका मानसोपचार तज्‍ज्ञ महिलेने केल्याने राज्‍यात खळबळ उडाली आहे.

महिलेने मुंबई हायकोर्टात या प्रकरणात रिटयाचिका दाखल करून न्‍यायाची मागणी केल्याने न्‍यायालयाने मुंबई पोलीस आयुक्‍तांना आदेश देत यात लक्ष घालून तक्रारीचे निवारण करा आणि २४ जूनला त्‍याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले आहे. त्‍यामुळे राऊतांची डोकेदुखी वाढली आहे.

महिलेने मुंबई पोलिसांना देखील या प्रकरणात प्रतिवादी केले आहे. उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर भाजपा नेते नीलेश राणे यांनी व्‍टिट करून राऊत यांच्‍यावर आरोप केले आहेत. पीडित महिला अनेक वर्षांपासून राऊतांच्‍या जाचाला सामोरी जात आहे. दोन आठवड्यांपूर्वीदेखील तिला कोणतंही कारण नसताना अटक करण्यात आली होती. राऊतांनी तिच्‍या आयुष्याची वाट लावली, असे राणेंनी म्‍हटले आहे.