शिवसेना, राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर पटोले यांचे घूमजाव

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अखेर सारवासारव करावी लागली. आपला आरोप राज्य सरकारवर नव्हता, तर केंद्र सरकावर होता, असे सांगत त्यांनी कोलांटउडी घेतली.आपल्या स्वबळाच्या ना-यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे टीकास्त्रही पटोले यांनी सोडले होते. त्यांच्या आरोपामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले होते, तर …
 

मुंबई : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अखेर सारवासारव करावी लागली. आपला आरोप राज्य सरकारवर नव्हता, तर केंद्र सरकावर होता, असे सांगत त्यांनी कोलांटउडी घेतली.
आपल्या स्वबळाच्या ना-यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे टीकास्त्रही पटोले यांनी सोडले होते. त्यांच्या आरोपामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले होते, तर मुख्यमंत्रीही नाराज झाले होते.

आपल्यामुळे सरकार आणि काँग्रेसही अडचणीत येत असल्याचे दिसताच पटोले यांना माघार घ्यावी लागली. माझा राज्य सरकारवर कोणताही आरोप नसून याबाबत मी लवकरच भूमिका स्पष्ट करेन, असे पटेल यांनी सांगितले. राज्य सरकार स्थिर असून, पुढचा कार्यकाळ सरकार पूर्ण करणार असल्याचा नेहमीचा सूर त्यांनी आळवला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे होत नसल्याच्या टीकेवर ते अद्यापही ठाम आहेत . निधी मिळत नसल्याची त्यांची तक्रार कायम असून त्याबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगून पटोले यांनी प्रकरणावर पडदा टाकला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी नाना पटोले यांच्या अज्ञानावर बोट ठेवले. राज्यात सरकार कुणाचेही असो; राजकीय कार्यक्रम, आंदोलने, बैठका किंवा महत्त्वाचे नेते, मंत्री त्यांच्या हालचालीची नोंद ठेवण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक असते. ते सर्व पक्षांची माहिती संकलित करून तो खात्यांतर्गत अहवाल करत असतात आणि संकलित माहिती गृहखात्याकडे जमा होते. ही पद्धत नाना पटोले यांना माहीत नसेल तर, त्यांनी त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून माहिती करून घेतली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.