शिक्षिकेला वर्गातच मिठीत घेतले, लॉजवर नेऊन केला बलात्कार, तिचे अश्लील फोटो केले व्हायरल!

नाशिक ः सिन्नर तालुक्यातील एका शिक्षिकेशी प्रेमसंबंध असल्याचा गैरफायदा एका तरुणाने घेतला. हा तरुण कायम तिच्या शाळेत जायचा. अनेकदा तर शाळेतच त्यानं तिला मिठीत घेतलं. गोवा, शिर्डी, सापुताऱ्याला नेऊन वेगवेगळ्या लाॅजवर तिच्याशी तिच्यावर बलात्कार केला. आता या तरुणावर बलात्कार आणि सरकारी कामातील अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचं नाव दीपक नवनाथ बहिरट असं आहे. …
 

नाशिक ः सिन्नर तालुक्यातील एका शिक्षिकेशी प्रेमसंबंध असल्याचा गैरफायदा एका तरुणाने घेतला. हा तरुण कायम तिच्या शाळेत जायचा. अनेकदा तर शाळेतच त्यानं तिला मिठीत घेतलं. गोवा, शिर्डी, सापुताऱ्याला नेऊन वेगवेगळ्या लाॅजवर तिच्याशी तिच्यावर बलात्कार केला. आता या तरुणावर बलात्कार आणि सरकारी कामातील अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचं नाव दीपक नवनाथ बहिरट असं आहे.

सिन्नर- कोळपेवाडी रस्त्यावर शहा नावाचं गाव आहे. दीपक तिथला आहे. तो व या शिक्षिकेचे अनेक वर्षांपासूनचे प्रेमसंबंध आहेत. प्रेमात आकंठ बुडाल्यानं तीही त्याच्यासोबत वाहवत गेली. कधी शिर्डीनजीकची सावळीविहीर, कधी गोव्याला तर कधी ती गुजरातमधील सापुताऱ्याला गेली. तिथं त्याच्यासोबतच लाॅजवर राहिली. त्यानं कधी संमतीनं तर कधी बळजबरीनं तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. दीपक तिला शाळेत जाऊन लग्न का करत नाहीत, असं म्हणून मिठीत घ्यायचा. तिचा लग्नाला विरोध होता. त्यामुळं त्यानं तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. तिला अश्लील संदेश पाठविले. त्‍यामुळे शिक्षिकेने वावी पोलीस ठाण्यात त्‍याच्‍याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच दीपक फरारी झाला आहे.